Vita, Tal-Khanapur, Dist-Sangli

About Us

आपले स्वागत आहे,

मा. डॉ. अजितराव सूर्यवंशी विशेष निवासी विद्यालय


राजमाता महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, बीड ही मतिमंद क्षेत्रात काम करणारी एक नावाजलेली संस्था आहे. सदर संस्थेची स्थापना 2007 मध्ये झालेली आहे. सदर संस्थेअंतर्गत काम करणा-या, मा. डॉ. अजितराव सूर्यवंशी विशेष निवासी विद्यालय, विटा या शाळेस 2009 पासून 100% ग्रॅंण्ड प्राप्त झाली आहे. मा. डॉ. अजितराव सूर्यवंशी हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

Our Achievements

  • 2016-2017

    मा. डॉ. अजितराव सूर्यवंशी यांना 'डॉक्टरेट' पदवी प्रदान

    मा. डॉ. अजितराव उध्दव सुर्यवंशी यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखणिय सामाजिक कार्याबद्दल द इंटरनॅशनल तामिल युनिव्हर्सिटी, यू एस ए व किंग्ज युनिव्हर्सिटी, यू एस ए, होनोलूलू, हवाली तर्फे 14 जुलै 2016 रोजी दिल्ली येथे डॉक्टर ऑफ लेटर पदवी प्रदान करण्यात आली.

    2017 - 2018

    मा. डॉ. अजितराव सूर्यवंशी विशेष निवासी शाळेस कृतीशील शाळा पुरस्कार

    बीड येथील राजमाता महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित विटा(ता.खानापुर) येथील मा. डॉ. अजितराव सूर्यवंशी विशेष निवासी शाळेने सन २०१७-२०१८ मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन शाळेस जिल्ह्यातील कृतीशील शाळा पुरस्कार मिळाला आहे.

    2017 - 2018

    जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

    अपंग कल्याण मंडळ समाज कल्याण विभाग व अपंग कल्याण शिक्षण संस्थेतर्फे ५४ जागतिक नि:समर्थ दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेमध्ये मा. डॉ. अजितराव सूर्यवंशी विशेष निवासी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकवला.

    2017 - 2018

    विभूतवाडीच्या वैभव खर्जेची भारताच्या फ्लोअर बॉल संघात निवड

    मेंढपाळ्याच्या मतिमंद मुलाने परिस्थितीवर मात करीत राज्य व राष्ट्रीय पातळीवर फ्लोअर बॉल स्पर्धेत घवघवीत यश संपादित करीत भारतीय संघात स्थान पटकावले आहे